महाराष्ट्राचा अपमान करणारे राज्यपाल मोदींच्या व्यासपीठावर कसे? : उद्धव ठाकरे | पुढारी

महाराष्ट्राचा अपमान करणारे राज्यपाल मोदींच्या व्यासपीठावर कसे? : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर कसे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात आजपर्यंत कीतीतर मुख्यमंत्री झालेत आणि यापुढेही होतील. पण मी म्हणजे सगळ काही, असा समज काहीजणांचा झाला आहे, अशी टीका ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्यांना असं वाटतं की शिवसेना म्हणजे आम्ही होतो, आणि आता शिवसेना संपली. पण ती लोकं संपलेत फक्त जगजाहीर व्हायचं बाकी आहे. सरकार येत-जात असतं. आजपर्यंत महाराष्ट्रात कीतीतर मुख्यमंत्री झालेत आणि यापुढेही होतील. पण याचा अर्थ असा नाही की, मी होतो तेव्हाच विकासकामे झालीत आणि यापुढे होणारच नाहीत. असा कोणीही समज करून घेऊ नये. पण मी म्हणजे सगळ काही असा समज काहीजणांचा झाला आहे, अशी टीका ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

पंतप्रधानांच्या आयोजित सभेच्या व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पंतप्रधानांच्या व्यासपीठावर कसा? असा सवाल त्यांनी केला आहे. आमचे मुख्यमंत्री लिहून दिलेली तेवढीच स्क्रीप्ट वाचतात. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी खटला प्रलंबित असताना कर्नाटक बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहे. डोक्यावरून पाणी गेले आहे. कर्नाटकाने गावांवर हक्क सांगितला असाताना महाराष्ट्राला कोणी वाली आहे की नाही? महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. मिंध्ये गटाचा नेते आधी बाळासाहेब ठाकरे होते आता पंतप्रधान मोदी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचे नेतेही मोदी आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेते एक असताना बोम्मई जोरात बोलत असताना आपले मुख्यमंत्री का बोलत नाहीत? पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजून काही बोलणार आहेत की नाहीत. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात येत्या १७ तारखेला मोर्चा आहे. या मोर्चात सर्व महाराष्ट्र मोठ्या ताकदीने एकवटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button