Gujarat Election 2022 : गुजरातमधील दारुण पराभवावर चिदंबरम म्‍हणाले, ” आम आदमी पार्टीने काँग्रेसचा खेळ …” | पुढारी

Gujarat Election 2022 : गुजरातमधील दारुण पराभवावर चिदंबरम म्‍हणाले, " आम आदमी पार्टीने काँग्रेसचा खेळ ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) पक्षामुळे काँग्रेसचा खेळ बिघडला. यापूर्वी गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतही असेच झाले होते, असा आरोप काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. ( Gujarat Election 2022 ) गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा आणि दिल्‍ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. यापैकी दोन ठिकाणी भाजपला मोठा झटका बसला आहे. याचे चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे, असा टोलाही त्‍यांनी या वेळी लगावला.

Gujarat Election 2022 :… गुजरातमधील पराभवातून काँग्रेसने धडा घ्‍यावा

गुजरातमध्‍येही भाजपच्‍या लोकप्रियतेमध्‍ये घट झाली असती. मात्र उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पार्टीने सर्व खेळ बिघडवला. आता २०२४च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष भक्‍कम अवस्‍थेत आहेत.मात्र गुजरातमध्‍ये झालेल्‍या पराभवातून काँग्रेस पक्षाने धडा घेण्‍याची गरज आहे. निवडणुकीत गुप्‍त अभियान वगैरे अशा काही गोष्‍टी नसतात, असेही चिदंबरम यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी दोन ठिकाणी झालेल्‍या पराभवावर चिंतन करावे

गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा आणि दिल्‍ली महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र दोन ठिकाणी भाजपला सत्ता गमावावी लागली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतन करण्‍याची गरज आहे. दोन ठिकाणी झालेला पराभव हा भाजपसाठी मोठा झटका आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेला विजय भाजपसाठी महत्त्‍वपूर्ण आहे. मात्र हे सत्‍य नाकारता येत नाही की, भाजपला हिमाचल प्रदेश आणि दिल्‍ली महानगरपालिका निवडणुकीत नामुष्‍कीजनक पराभवला सामोरे जावे लागले आहे, असेही चिदंबरम यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button