पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच शक्य झाले. असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते आज विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर नागपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चे (Samruddhi Mahamarg) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.11) लोकार्पण झाले. यानंतर आयोजित सभेत फडणवीस म्हणाले की, राज्यातील सरकार बदलल्यानंतर विकासकामे वेगाने सुरू झाली. हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकास वेगाने होत आहे.
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. गतिशक्ती योजनेमुळे भारताचं चित्र बदलेल. नागपूर ते गोवा महामार्गाची संकल्पनाही तयार करण्यात आली आहे. येणाऱ्या एक महिन्यात नागपूर विमानतळाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींना पुन्हा आमंत्रित करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा :