Samruddhi Mahamarg : आगामी काळात महाराष्ट्रात 75 हजार कोटी रुपयांचे ग्रीन महामार्ग – नितीन गडकरी | पुढारी

Samruddhi Mahamarg : आगामी काळात महाराष्ट्रात 75 हजार कोटी रुपयांचे ग्रीन महामार्ग - नितीन गडकरी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाप्रमाणे लवकरच महाराष्ट्रात 75 हजार कोटी रुपयांचे ग्रीन महामार्ग आगामी काळात होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात 6 द्रूतगती मार्ग बनणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भविष्यात औरंगाबाद-पुणे महामार्ग लवकरच तयार होईल. तर सूरत ते चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग व्हाया नाशिक-अहमदनगर विकसीत करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकापर्ण, तसेच अन्य विविध कामांचे भूमिपूजन आणि एम्सचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेण्यात आली. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग निर्मिती दरम्यान जलसंधारणाचे मोठे काम झाले. 600 लाख क्यबिक वॉटर क्युबेज वाढवण्यात आले आहे. अमृत सरोवरसह मार्गातील अनेक नद्या, नाले, तलाव यांचे खोलीकरण करण्यात आले. 11 लाख वृक्ष लावण्यात आले. जलसंधारणाचे काम हे समृद्धी महामार्गाचे मोठे वैशिष्ट्य आहे. भविष्यात अशाच प्रकारचे 75 हजार कोटी रुपयांचे ग्रीन महामार्ग आगामी काळात होणार आहे, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

हे ही वाचा :

समृद्धी महामार्गाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच शक्य : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समृद्धीची भाग्यरेषा आज महाराष्ट्र चरणी अर्पण!

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : शाई फेकणाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Back to top button