MP News : तब्बल ८४ तासांनंतर तन्मयला बोअरवेलमधून बाहेर काढलं; पण त्याचा जीव वाचला नाही | पुढारी

MP News : तब्बल ८४ तासांनंतर तन्मयला बोअरवेलमधून बाहेर काढलं; पण त्याचा जीव वाचला नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : ५५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मय साहू या आठ वर्षांच्या मुलाला बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तन्मयचा जीव वाचू शकला नाही. ८४ तास बचावकार्य राबविण्यात आले होते.  पण चिमुकल्या तन्मयचा जीव मात्र वाचवता आला नाही. ही घटना घडली आहे मध्यप्रदेश (MP News) राज्यातील बैतुल (Batul) जिल्ह्यातील मांडवी गावात. तन्मय मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जुन्या बोअरवेलमध्ये पडला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुनील साहू हे हा मध्य प्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यातील मांडवी गावात राहतात. त्यांना तन्मय नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. तन्मय आपल्या मित्रांसह खेळत होता. खेळता खेळता तो जवळच्या बोअरवेलमध्ये पडला. ती बोअरवेल दोन वर्ष बंद होती. ही घटना मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच SDERF टीम आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. सुमारे ५० फूट खोलीवर तन्मय अडकून बोलत होता. बोअरवेलपासून सुमारे ३० फूट अंतरावर बुलडोझर व पोकलेन मशिनच्या साहाय्याने बोगदा काढण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले. पोकलेन मशिनच्या साह्याने सुमारे ५० फूट खोलीपर्यंत खोदकाम करण्यात आले, त्यानंतर अडकलेल्या तन्मयपर्यंत बोगद्याचे काम करण्यात आले. तब्बल ८४ तास हे सुरु होतं. तब्बल ८४ तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

चिमुकल्या तन्मयचा जीव मात्र वाचवता आला नाही

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तन्मयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सिव्हिल सर्जन अशोक बरंगा यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. तन्मयला बोअरवेलमधून बाहेर काढताना आपल्या मुलाचा चेहराही दाखवला नाही, याबद्दल तन्मयच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली.

MP News : युद्धपातळीवर बचावकार्य

मांडवी गावात मंगळवारी संध्याकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या आठ वर्षीय तन्मय साहूला वाचवण्यासाठी गेल्या ८४ तासांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत NDRF आणि SDERF च्या टीमने बोअरवेलला समांतर ५० फूट खड्डा खोदून सुमारे नऊ फूट लांबीचा बोगदा तयार केला. ढिगारा हटवण्याचे काम काही काळ थांबविण्यात आले. त्यानंतर तन्मयच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. डॉक्टरांचे एक पथक घटनास्थळी हजर होते, त्यांनी तन्मयला बाहेर काढल्यानंतर तत्काळ चाचण्या केल्या आणि रुग्णालयात नेले. जिथे मुलाला मृत घोषित करण्यात आले. तन्मयचा मृतदेह त्याच्या नातेवाईंकाना दाखवण्यात आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईंकानी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल 

मध्य प्रदेशचे मुख्य़मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ८ वर्षीय तन्मय साहूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी तन्मयच्या  कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा

Back to top button