नागपूर : रुग्णवाहिकेतील दोन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही | पुढारी

नागपूर : रुग्णवाहिकेतील दोन ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये आज (दि.९) दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी, रेवतीनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर बॉम्बसारखा आवाज ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर पळत आले. स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोळ दिसत होते. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि बेलतरोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button