Elephant calf rescue: नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला मासेमारांनी असं वाचवलं; थरारक VIDEO पहा

Elephant calf rescue Teesta river West Bengal: तीस्ता नदीच्या पात्रात पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या अवघ्या चार दिवसांच्या हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्थानिक मासेमारांनी शर्थीचे प्रयत्न केले.
Elephant calf rescue Teesta river West Bengal
Elephant calf rescue Teesta river West BengalFile Photo
Published on
Updated on

Elephant calf rescue Teesta river West Bengal

जलपाईगुडी: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात एक थरारक घटना समोर आली आहे. तीस्ता नदीच्या पात्रात पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या अवघ्या चार दिवसांच्या हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्थानिक मासेमार आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, पाण्यात सुखरूप बाहेर काढले आणि पिल्लावर उपचार करून अवघ्या काही तासांतच आई आणि पिल्लाची पुन्हा भेट घडवून आणली.

काय घडलं होतं?

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जलपाईगुडी जिल्ह्यातील बैकुंठपूरमध्ये हत्तींचा एक कळप तीस्ता नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यातील एक पिल्लू आपल्या आईपासून दुरावले आणि पाण्याच्या प्रवाहात तब्बल चार किलोमीटर लांब वाहून गेले. तीस्ता बॅरेजजवळ नदीत बुडत असलेल्या या पिल्लाला काही स्थानिक मासेमारानी पाहिले.

Elephant calf rescue Teesta river West Bengal
Viral Video Woman throws dog in river: माणुसकीचा अंतच झाला? महिलेने थेट पुलावरून कुत्र्याला नदीत फेकले; क्रूर VIDEO व्हायरल

मासेमारांची धाडसी कारवाई

स्थानिक मासेमारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या छोट्या होडीतून नदीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या पिल्लाचा पाठलाग केला. आई गजल्डोबा येथे प्रवाहाच्या वरच्या बाजूला होती, तर पिल्लू प्रवाहाच्या दिशेने चार किलोमीटर खाली वाहून गेले होते. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी या पिल्लाला सुरक्षितपणे आपल्या छोट्या होडीत घेतले आणि या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला दिली.

बैकुंठपूरचे वनसंरक्षक मुदित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्लाला सुखरूप किनाऱ्यावर आणल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्याची तातडीने तपासणी करण्यात आली. सुदैवाने, या दुर्घटनेत पिल्लाला कोणतीही दुखापत झाली नव्हती.

आई आणि पिल्लाची पुन्हा भेट

पिल्लाला मनुष्याचा जास्त वेळ स्पर्श राहिल्यास आई त्याला स्वीकारणार नाही, या भीतीने वनविभागाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. काही वेळातच वन अधिकाऱ्यांनी आणि मासेमारांच्या मदतीने या पिल्लाला त्याच्या आईच्या आणि कळपाच्या जवळ सोडले. आईनेही आपल्या पिल्लाला तात्काळ ओळखले आणि दूध पाजत आपल्यात सामावून घेतले. पिल्लाचे आपल्या आईशी झालेले हे आनंदाचे पुनर्मिलन पाहून वनकर्मचाऱ्यांनीही सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान, सिलीगुडी आणि गजलडोबा परिसराजवळील बैकुंठपूर वन विभाग हा महानंदा आणि तीस्ता नदीच्या खोऱ्यात वसलेला असून, हा परिसर आशियाई हत्ती, बिबट्या आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींसाठी ओळखला जातो. या घटनेमुळे मासेमार आणि वनविभागाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Elephant calf rescue Teesta river West Bengal
Viral Video: रात्री अल्पवयीन जोडप्याला घेरलं, आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस Action Mode मध्ये, तीन विकृत ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news