Bail applications – जामीन अर्जावर १० मिनिटांच्या वर सुनावणी नको : सर्वोच्च न्यायालय

Bail applications – जामीन अर्जावर १० मिनिटांच्या वर सुनावणी नको : सर्वोच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन : न्यायलयांनी जामीन अर्जावर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुनावणी घेऊ नये, असे निरीक्षण सर्वोच न्यायालयाने नोंदवले आहे. बरेच दिवस चालणाऱ्या जामीन अर्जांमुळे न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय होतो, असे न्यायमूर्ती संजय कौल आणि ए. एस. ओक यांनी म्हटले आहे. (Bail applications)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या याचिकेवर सुनावणी वेळी न्यायमूर्तींनी हे मत व्यक्त केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालीद याच्या जामीन अर्जावर सुनावणी वेळी शर्जिल हा दिल्ली दंगलींचा सूत्रधार असल्याचे म्हटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्याला बचावाची संधी न देता ही टिप्पणी केली आहे, हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे शर्जिलने याचिकेत म्हटले आहे.

"जामीन अर्जावर दीर्घकाळ सुनावणी सुरू राहिली तर असे प्रकार घडतात. दोषारोप पत्र सिद्ध झाल्यानंतर त्यावर जे अपिल दाखल होतात, त्यावरील सुनावणीसारखा हा प्रकार आहे," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले

खालीदच्या जामीन अर्जावर २० दिवस सुनावणी सुरू होती, त्यामध्ये शर्जिलवर न्यायालयाने टिप्पणी केली. दिल्ली उच्चन्यायालयाने केलेल्या टिप्पणीचा कोणताही परिणाम या खटल्यावर होणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news