दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली पीएमसी ठेवीदारांची याचिका | पुढारी

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली पीएमसी ठेवीदारांची याचिका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  दिल्ली उच्च न्यायालयाने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बॅंक (पीएमसी) ठेवीदारांची याचिका फेटाळली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्यासंबंधी खातेधारकांवर घातलेल्या निर्बंधांना याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्यांबद्दल सहानुभूती असूनदेखील न्यायालय दिलासा देवू शकत नाही, असे न्यायमूर्ती प्रतिक जालान यांनी याचिका फेटाळताना स्पष्ट केले.

याचिकाकर्ते ज्या स्थितीत आहे, त्याबद्दल सहानुभूती आहे. पंरतु, याचिकेतून मागण्यात आलेला दिलासा देण्यास न्यायालय असमर्थ आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जासह याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हंटले आहे. २०१९ मध्ये पीएमसी बॅंकेतील प्रत्येक बचत, चालू खातेधारकांसह ठेवीदारांना खात्यामधून एकूण शिल्लक रकमेच्या १ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. यानंतर ही मर्यादा ४० हजार रुपये करण्यात आली होती,असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

        हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button