Gujarat election and Chandrakant Patil : कोण आहेत गुजरात भाजपचे ‘चाणक्‍य’ चंद्रकांत पाटील?

Gujarat election and Chandrakant Patil :  कोण आहेत गुजरात भाजपचे ‘चाणक्‍य’ चंद्रकांत पाटील?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप सलग सातव्‍यांदा गुजरातचे तख्‍त काबीज करण्‍यात यश मिळणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. मतमोजणीत अभूतपूवर्व विजयाकडे भाजपची वाटचाल सुरु आहे. या विजयाचे शिल्‍पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा हे आहेतच. त्‍याचबरोबर निवडणूक रणनीतीमध्‍ये भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देण्‍यात गुजरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील ( सी. आर. पाटील) यांचाहड सिंहाचा वाटा राहिला आहे. ( Gujarat election and Chandrakant Patil ) जाणून घेवूया मूळचे मराठी असणारे चंद्रकांत पाटील यांच्‍या राजकीय प्रवासाविषयी…

 मूळचे मराठी

चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९५५ रोजी महाराष्ट्रातील जळगावमधील पिंपरी अकरौत गावात झाला. त्या काळात जळगाव मुंबई प्रांतात होते. १९६० मध्‍ये भाषावर प्रांतरचना झाली. महाराष्‍ट्र आणि गुजरात अशी दोन राज्‍ये निर्माण झाली. यानंतर पाटील कुटुंबीय गुजरातला रवाना झाले. या वेळी चंद्रकांत पाटील पाच वर्षांचे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमध्‍ये झाले. यानंतर त्यांनी सुरतमध्‍ये आयटीआय कोर्स केला.

पाोलीस हवालदार ते पत्रकार…

चंद्रकांत पाटील यांचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. वडिलांचा आदर्शावर वाटचाल करत चंद्रकांत पाटीलही पाोलीस दलात हवालदार पदावर रूजू झाले. येथेही त्‍यांचे नेतृत्त्‍व गुण दिसले. पोलीस कर्मचार्‍यांना येणार्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी पाोलीस पर्सनल युनियन स्‍थापन करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांच्‍यावर शिस्‍तभंगाची कारवाई करत त्‍यांना निलंबित करण्‍यात आले. १४ वर्ष पाोलीस दलात सेवा बजावल्‍यानंतर त्‍यांनी १९८४ नाोकरीचा राजीनामा दिला. यानंतर त्‍यांनी काही काळ पत्रकारीता केली. १९९१ मध्‍ये त्‍यांनी स्‍वत:चे नवगुजरात टाइईम्‍स नावाने दैनिकही सुरु केले.

वाजपेयी यांच्‍या उपस्थितीत भाजपमध्‍ये प्रवेश

चंद्रकात पाटील यांनी भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर १९८९ रोजी भाजपमध्‍ये प्रवेश केला. सुरतमधील भाजपचे तत्‍कालीन नेते सी.आर.खरा आणि काशीराम राणा यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली त्‍यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पक्षाने त्‍यांच्‍यावर सुरत शहर कोषाध्‍यक्ष पदाची जबाबदारी साोपवली. प्रत्‍येक काम अचूकतेने करण्‍याचा वृत्ती आणि संपूर्ण समर्पण भावनेने काम करण्‍याची तळमळ यामुळे अल्‍पवधीत पक्षाने त्‍यांना सुरत शहर भाजप उपाध्‍यक्षपद सोपवले.

१९९८ मध्‍ये गुजरातचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री केशुभाई पटेल यांनी त्‍यांची अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड (GACL) चे अध्यक्षपदी नियुक्ती केली. २००९ मध्‍ये नवसारी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर सलग तीनवेळ त्‍यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधत्‍व केले. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत त्‍यांनी तब्‍बल ६.८९लाख मतांच्‍या फरकाने विजय मिळवला. या आकडेवारीवरुन त्‍यांच्‍या मतदारसंघातील लोकप्रियतेचा अंदाज येतो.

Gujarat election and Chandrakant Patil : नरेंद्र मोदींचे निकटवर्ती

गुजरातचे माजी मुख्‍यमंत्री केशुभाई पटेल गट आणि नरेंद्र मोदी गट यांच्‍यातील अंतर्गत राजकारणात चंद्रकांत पाटील हे मोदी समर्थक म्‍हणून ओळखले जातात. सूरतमधील कारखानदार ते कामगारांपर्यंत त्‍यांचा दांडगा जनसंपर्क आहे. वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचे ते मालक आहेत. तसेच शेतकरी असणार्‍याबरोबरच एक यशस्‍वी उद्योगपती अशीही त्‍यांची ओळख आहे.

मराठी भाषिकांमधील लोकप्रिय चेहरा

सुरतमध्‍ये गणेशोत्‍सव आ‍‍‍णि दहीहंडी सणासाठी गो.विंदा कमिटी उपक्रम मोठ्या प्रमाणावर करण्‍याचे श्रेय चंद्रकांत पाटील यांना जाते. गुजरातमधल मराठी भाषिकांमधील ते लोकप्रिय नेते आहेत.

भाजपचे सीआर पाटील… निकटवर्तींचे सीआर आणि विरोधकांचे 'पाटीलभाऊ'…

जुलै २०२० मध्‍ये भाजपने जितेंद्रभाई वाघानी यांच्‍याकडे असणारी गुजरात प्रदेशाध्‍यक्षदाची धुरा चंद्रकांत पाटील यांच्‍यावर सोपवली होती. भाजपमध्‍ये सीआर पाटील म्‍हणून परिचित असणारे चंद्रकात पाटील यांना निकटवर्ती सीआर नावाने ओळखात. तर विरोधी पक्ष 'पाटीलभाऊ' असा उल्‍लेख करत त्‍यांच्‍यावर टीकास्‍त्र सोडतात. आज त्‍यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली लढवलेल्‍या निवडणुकीत गुजरात विधानसभेवर आपला झेंडा अबाधित ठेवण्‍यात भाजपचा यश मिळाले आहे. त्यामुळेच गुजरात भाजपबरोबरच सीआर पाटील यांच्या नावाची चर्चा राष्‍ट्रीय पातळीवर सुरु झाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news