Gujrat Assembly Election 2022 : हार्दिक पटेलची सर्वात जास्त चर्चा, काय असेल हार्दिकचे भविष्य?

Gujrat Assembly Election 2022 : हार्दिक पटेलची सर्वात जास्त चर्चा, काय असेल हार्दिकचे भविष्य?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gujrat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीत पटेल / पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. पाटीदार समाजाच्या मतदानामुळे निकालांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे हार्दिक पटेल या पाटीदार समाजाच्या युवा चेहरा भाजपने जनतेला दिला आहे. मात्र हार्दिक पटेल हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे हार्दिक पटेल हे उत्तम कौशल्य असलेले युवा नेतृत्व असले तरी काँग्रेसमधून भाजप प्रवेश करणा-या हार्दिक पटेल यांचे भविष्य काय असेल? याची मोठी चर्चा गुजरात निवडणुकीत होत आहे.

हार्दिकचा जन्म 20 जुलै 1993 रोजी गुजरातमध्ये झाला आणि त्यांचे वडील भरत भाई आणि आई उषा पटेल यांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. पटेल कुटुंबाने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी विरमगाम शहराची निवड केली आणि ते येथे राहायला आले. हार्दिक पटेलने विरमगामच्या दिव्य ज्योत स्कूलमधून सहावी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 2010 मध्ये त्याने अहमदाबादच्या हार्दिक सहजानंद कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेतले.

Gujrat Assembly Election 2022 : महाविद्यालयातूनच विकसित झाले नेतृत्वाचे गुण

महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.
हार्दिक पटेल हा गुजरातमधील पटेल समाजाच्या ओबीसी आरक्षण आंदोलनासाठी ओळखला जातो. पटेल समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या आंदोलनाचा नेता म्हणून ते उदयास आले.

Gujrat Assembly Election 2022 : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 16 महिन्यांत प्रदेशाध्यक्ष झाले

हार्दिक पटेल 12 मार्च 2019 रोजी काँग्रेस पक्षात समावेश केल्यानंतर त्याने प्राथमिक सदस्य ते कार्यरत प्रदेशाध्यक्ष असा प्रवास अवघ्या 16 महिन्यांत पूर्ण केला होता. काँग्रेसमध्ये हार्दिक पटेलला चांगली संधी होती. मात्र, २०२२ च्या गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी त्यांचा पक्षात समावेश केला.

Gujrat Assembly Election 2022 : गुजरातच्या विरमगाम मतदार संघातून हार्दिक पटेल निवडणूक लढवत आहे

गुजरातमधील विरमगाम मतदारसंघातून भाजपने हार्दिक पटेलला तिकीट दिले आहे. हार्दिकने त्याच्या सुरुवातीच्या काळात विरमगाममध्ये शिक्षण घेतले आहे आणि त्याचा त्याला नक्कीच काही फायदा होऊ शकतो. 2012 आणि 2017 च्या सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने विरमगामची जागा जिंकली असली होती.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news