Gujarat Election AAP Update : गुजरातमध्ये ‘आप’ ची ‘कासवाच्या’ गतीने वाटचाल  | पुढारी

Gujarat Election AAP Update : गुजरातमध्ये 'आप' ची 'कासवाच्या' गतीने वाटचाल 

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत आत्ताच्या घडीत आम आदमी पार्टीने नऊ जागांवर आघाडी घेतली आहे. आपची कासवाच्या’ गतीने वाटचाल सुरु आहे. येणारा वेळचं ठरवेल आप (Gujarat AAP) बाजी मारणार का? वाचत रहा गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल अपडेट (Gujarat Election AAP Update )

Gujarat Election AAP Update : आप आतापर्यंत फक्त 9 जागांवर आघाडीवर

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी (दि.८) जाहीर होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेत येण्याचा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ९२ जागा प्राप्त होणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये यावेळी पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे या पक्षाच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे. (Gujarat Election Result 2022)

सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने मोठी आघाडी घेतली. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही काही जागांवर आघाडी घेतली. मात्र आपची सुरुवात निराशाजनक राहिली. सुरुवातीच्या 1 तासाच्या हाती आलेल्या कलांमध्ये गुजरातला खातेही उघडता आले नाही. मात्र, नंतर हळूहळू आपने आपली वाटचाल सुरू केली. 1,2 3 नंतर आम आदमी पक्ष आता 9 जागांवर आघाडीवर आहे. आपची कासवाच्या’ गतीने वाटचाल सुरु आहे. येणारा वेळचं ठरवेल आप (Gujarat AAP) बाजी मारणार का?

हिमाचल विधानसभा निवडणुकीत मात्र आपला अजूनही खात उघडता आलेलं नाही.

हेही वाचा 

Back to top button