विजय सेतुपतीच्या सेटवर मोठी दुर्घटना, २० फुटांवरून पडल्याने स्टंटमॅनचा मृत्यू | पुढारी

विजय सेतुपतीच्या सेटवर मोठी दुर्घटना, २० फुटांवरून पडल्याने स्टंटमॅनचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार विजय सेतुपती यांच्या चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे. एका स्टंटमॅनचा तब्बल २० फूट उंचीवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विजय सेतुपती यांचा आगामी चित्रपट ‘विदुथलाई’च्या शूटिंग सुरु होते. येथे स्टंटमॅन सुरेश विजयचा मृत्यू झाला. सुरेश विजय ५४ वर्षांचे होते. स्टंटमॅन एस सुरेश विजय सेतुपतीसाठी स्टंट करत असताना त्याचा अपघात झाला.

‘विदुथलाई’ चित्रपटाचे शूटिंग चेन्नईतील वंदलूरमध्ये सुरू होते. यावेळी सुरेश स्टंट करत होता. एका सीननुसार त्याला २० फुटांवरून उडी मारायची होती. स्टंट सीक्वेन्ससाठी सुरेश आणि इतर काही जणांना दोरीने बांधले गेले होते. तेव्हा ट्रेनच्या दुर्घटनेचा सीन शूटिंग सुरु होते. सुरेशला क्रेनने पकडलेल्या दोरीवर ठेवले होते. पण सीन सुरु होताच दोरी तुटली. त्यावेळी सुरेश २० फुटांवरून खाली पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुरेश २५ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमन म्हणून काम करत होते. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Back to top button