‘एम्स’ पाठोपाठ सफदरजंग रुग्णालयालाही हॅकिंगचा फटका | पुढारी

'एम्स' पाठोपाठ सफदरजंग रुग्णालयालाही हॅकिंगचा फटका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील एम्स रुग्णालयापाठोपाठ सफदरजंग रुग्णालयालाही हॅकिंगचा फटका बसला असून, यामागे चीनचा हात असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. सुदैवाची बाब म्हणजे सफदरजंग रुग्णालयावरील सायबर हल्ला ‘एम्स’ इतका गंभीर नाही.

सफदरजंगचे बहुतांश कामकाज ‘मॅन्युअल कोड’ नुसार होत असल्याने या रुग्णालयाचा डेटा लिक होण्याची शक्यता कमी आहे.  हॅकिंगमुळे रुग्णालयाचे काही सर्व्हर प्रभावित झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच हॅकर्सनी संगणक प्रणालीला प्रभावित केले होते आणि सर्व्हर एका दिवसासाठी बंद पडले होते. नव्याने झालेला हल्ला फारसा चिंतादायक नसल्याचे सफदरजंग रुग्णालयाचे संचालक डॉ. बी. एल. शेरवाल यांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने ‘एनआयसी’च्या मदतीने परिस्थिती पूर्वपदावर आणली असल्याची माहितीही त्यांनी दिली. एम्स रुग्णालयाच्या प्रणालीवर ‘रॅनसमवेयर’ चा हल्ला झाला होता आणि तेथील परिस्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.

हेही वाचा :  

जीव वाचवण्यासाठी समुद्रात घेतलेली उडी आणि ऑलिंपिकचं लक्ष्य… वाचा या दोन बहिणींचा प्रेरणादायी प्रवास

कोल्हापूर : भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

Back to top button