Bilkis Bano : अकरा दोषींच्या सुटकेला बिलकिस बानोचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र )

नवी दिल्‍ली: पुढारी वृत्तसेवा – गुजरात दंगलीदरम्यान हिंसाचार आणि सामुहिक बलात्काराचा सामना करावा लागलेल्या बिलकिस बानोने या प्रकरणातील अकरा दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 13 मे रोजी देण्यात आलेल्या सुटकेच्या आदेशाचा पुनर्विचार केला जावा, असे बिलकिसने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेकरिता 1992 साली बनविण्यात आलेले नियम लागू असतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार बिलकिस बानो प्रकरणातील ११ दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. अकरा दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका याआधीच सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यातील एक याचिका महिला संघटनेने दाखल केली होती. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिका मुख्य याचिकेला जोडल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news