Ravish Kumar Resigns : ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी दिला NDTV चा राजीनामा | पुढारी

Ravish Kumar Resigns : ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी दिला NDTV चा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravish Kumar Resigns : एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांनी राजीनामी दिला आहे. एनडीटीव्ही ग्रुपचे अध्यक्ष सुपर्णा सिंह यांच्याकडून तेथील कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवण्यात आला. ज्यामध्ये लिहले आहे की, रविश यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला आहे. तसेच हा राजीनामा तात्काळ प्रभावानं लागू होईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी डायरेक्टर्स पदावरून राजीनामा दिल्यानंतर रविश यांनीही राजीनामा दिला आहे. रवीश कुमार यांचा ‘प्राइम टाइम’ हा टेलिव्हिजन न्यूज शो प्रसिद्ध आहे. रवीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून एनडीटीव्हीशी संलग्न आहेत. त्यांना पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.

एक दिवसापूर्वी आरआरपीआर होल्डिंग प्रायवेट लिमिटेड कंपनीने आपल्या इक्विटी शेअर बाबत माहिती दिली होती. ज्यामध्ये ९९.५ टक्के इक्विटी शेअर विश्व प्रधान कमर्शियल प्रायव्हेट लि. कंपनीकडे आहेत. या कंपनीची मालकी अदानी ग्रुपची माध्यम कंपनी एएमजी मीडीया नेटवर्क्सकडे आहे. याबरोबरच अदानी ग्रुपकडे एनडीव्हीचा २९.१८ ट्क्के हिस्सा आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button