

पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या डिजिटल रुपायाची रिटेल ग्राहकांसाठीची चाचणी १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. टोकन स्वरूपात हे चलन उपलब्ध होणार आहे. (Retail Digital Rupee)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, "रिटेल डिजिटल रुपायाची चाचणी १ डिसेंबरपासून सुरू होईल. ग्राहक आणि व्यापारी यांच्या ठराविक क्लोज ग्रुपसाठी हे चलन उपलब्ध होत आहे. सध्या काही ठराविक भागांतच ही चाचणी घेतली जात आहे."
डिजिटल रुपायाचे मूल्य कागदी रुपया इतकेच असणार आहे. हे चलन बँकाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी या महिन्याचा सुरुवातीला डिजिटल चलन रिटेल ग्राहकांसाठी देण्यासाठीची चाचणी सुरू केली जाणार असल्याचे म्हटले होते.
पहिल्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक यात सहभागी होतील. तर पहिल्या टप्प्यात ही चाचणी मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, भुवनेश्वर या चार शहरांचा समावेश आहे.
पुढच्या टप्प्यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक या बँका आणि अहमदाबाद, गंगटोक, गुवाहटी, हैद्राबाद, इंदूर, कोची, लखनऊ, पटना आणि शिमला या शहरांत ही चाचणी होईल. टप्प्याटप्प्याने यात इतर बँका आणि शहरांचा समावेश केला जाणार आहे.
हेही वाचा