चीनशी स्पर्धा करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण विधेयक गरजेचे : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह | पुढारी

चीनशी स्पर्धा करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण विधेयक गरजेचे : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारताकडे मर्यादित संसाधने असल्याने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आता खूप महत्त्वाचे आहे. भारताचा वेगाने विकास करत चीनशी स्‍पर्धा करायची असेल तर लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागेल, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आणि ‘एक मूल धोरण’ लागू करून विकास साधला. चीनमध्ये एका मिनिटात 10 मुले जन्माला येतात. तर भारतात 30 मुले एका मिनिटात जन्माला येतात; मग आम्ही चीनशी स्पर्धा कशी करणार ? असा सवाल उपस्थित करून त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसंख्या नियंत्रण विधेयक  धर्म किंवा पंथाची पर्वा न करता सर्वांना लागू केले जावे. जे त्याचे पालन करत नाहीत, त्यांना सरकारी लाभ देऊ नये. कायदा न पाळणाऱ्यांचा मतदानाचा हक्कही काढून घ्यावा, असेही गिरिराज सिंह म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button