Satyendar Jain: तिहार जेलमध्ये मसाज, मस्त जेवण अन् आता हाउसकीपिंग; सत्येंद्र जैन यांचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Satyendar Jain: तिहार जेलमध्ये मसाज, मस्त जेवण अन् आता हाउसकीपिंग; सत्येंद्र जैन यांचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन: तिहार जेलमध्ये असलेले ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांचे एकामागून एक व्हिडिओ समोर येत आहेत. जेलमधील नव्या व्हिडिओत सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये देण्यात आलेल्या सुविधांचे चित्रण आहे. व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओत जैन यांचा मसाज करताना काही लोक दिसत होते. तर दुसऱ्या व्हिडिओत त्यांच्यासाठी जेवणाची करण्यात येणारी अलिशान सोय दाखवण्यात आली होती. तर आता व्हायरल झालेल्या नव्या व्हिडिओत जैन यांच्या रूमची स्वच्छता आणि आवराआवर दाखवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकिची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूकीत भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात जोराची टक्कर आहे. निवडणूक प्रचारात देखील ते एकमेकांवर वार पलटवार करताना दिसतात. या दरम्यानच भारतीय जनता पक्ष (भाजप) जैन यांचे असे व्हिडिओ शेअर करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्विटरवर जैन यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, ‘तिहारच्या आप का दरबारनंतर आता तिहारमध्ये रूम सर्व्हिस!’

पुढे त्यांनी असे ही म्हटले आहे की, येथे सत्येंद्र जैन यांना ८ ते १० लोक हाऊसकिपिंग आणि व्हीव्हीआयपी सेवा देत आहेत. ज्यांनी बलात्कारी गुन्हागाराकडून मालिश करून घेतली. जेलमध्ये टीव्ही, मिनरल वॉटर, मालीशचा आनंद लुटला आहे. फळे, सुका मेवा, नवाबी जेवण, कारागृह अधीक्षकांची वैयक्तिक भेट! काय चालले आहे?” असे देखील भाजपच्या प्रवक्याने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button