खोट्या माहितीवर भारताला ठरवले असहिष्णू; अमेरिकी संस्थेची ट्विटरवर चिरफाड

खोट्या माहितीवर भारताला ठरवले असहिष्णू; अमेरिकी संस्थेची ट्विटरवर चिरफाड

पुढारी ऑनलाईन – युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) या संस्थेने एका खोट्या अहवालाच्या आधारावर भारतात धार्मिक स्वातंत्र्य खराब असल्याचे म्हटले आहे. यावरून ट्विटरवर या संस्थेची चांगलीच चिरफाड केली जात आहे.
या संस्थेने नोव्हेंबर २२ला हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात भारतात धार्मिक स्वातंत्र्यांची स्थिती खराब असल्याचे म्हटले आहे. या अहवालात टेक फ्रॉग संबंधित एका बातमीचा आधार घेण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

द वायर या वेबसाईटने काही महिन्यांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती. भारतीय जनता पक्ष इन्स्टाग्राचा गैरवापर करत आहे असा यात आरोप करण्यात आला होता. मेटा भाजपला झुकते माप देते, भाजपकडे टेक फ्रॉग नावाचे अॅप असून त्याला सोशल मीडियात सुपर पॉवर आहे, त्याच्या मदतीने भाजप कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्वतःच्या फायद्यासाठी वापरते, अशा स्वरूपाची ही बातमी होती. या बातमीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाच्या कार्यपद्धतीवर यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले होते. पण मेटाने ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध केल्यानंतर द वायरला हा लेख मागे घ्यावा लागला होता.

आता याच लेखाचा आधार घेत युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमने भारतात धार्मिक स्वातंत्र्य यथातथा असल्याची टीका केली आहे. ट्विटरवर अनेक युजर्सनी या अहवालाची पोलखोल केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news