केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने निर्मला सीतारामन यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून मागविले सल्ले | पुढारी

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने निर्मला सीतारामन यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून मागविले सल्ले

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचे अर्थमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांकडून सल्ले मागविले आहेत. राज्यांचे अर्थमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांसोबत सीतारामन यांनी शुक्रवारी यासंदर्भात एक बैठक घेतली.

अर्थमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पंकज चौधरी, महसूल खात्याचे सचिव अजय सेठ, संजय मल्होत्रा तसेच मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन हेही उपस्थित होते. छत्तीसगडकडून या बैठकीत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे 17 हजार 240 कोटी रुपये परत देण्याची मागणी करण्यात आली.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून विविध क्षेत्रांकडून सल्ले मागविले जात आहेत. अर्थमंत्र्यांनी यासंदर्भात नुकताच आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आदी क्षेत्रांशी संबंधित मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.

हेही वाचा

नाशिकमधील ‘त्या’ दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली ‘ही’ मागणी

स्टील मार्केटमध्ये सुविधांसाठी आंदोलन; मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचा निषेध

सातारा : मुख्यमंत्री साहेब, धरणग्रस्तांचे वाली व्हा

Back to top button