स्टील मार्केटमध्ये सुविधांसाठी आंदोलन; मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचा निषेध | पुढारी

स्टील मार्केटमध्ये सुविधांसाठी आंदोलन; मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचा निषेध

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा :  धिक्कार असो धिक्कार असो.. मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचा धिक्कार असो, या समितीच करायचं काय.. खालती डोकं वर पाय, बाजार समिती हाय हाय.. बाजार समिती हाय हाय  अश्या घोषणाबाजी करत स्टील मार्केट परिसरातील व्यापारी तसेच, ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी रस्त्यावर उतरून मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीचा निषेध व्यक्त केला. या वेळी या मोर्चा मध्ये व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते.

व्यापार आणि वातुकीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या मध्ये, तसेच आशिया खंडातील क्रमांक एकचे म्हणून ओळख असलेले कळंबोली शहरातील स्टील मार्केट सध्या समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. मोठे उत्पादन मिळत असून देखील या बाजार समितीच्या आवारात मिळणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा तोकड्या असल्याने.

बाळासाहेबांच्या शिवसेनेने शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली आज बाजार समितीच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी मार्केट परिसरात रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, पावसाळी गटारे याशिवाय धुळीचे साम्राज्य असल्याने व्यापाऱ्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनाचे नुकसान होत असल्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच वाहनचालकांना राहण्याची वेवस्था तसेच पिण्याची वेवस्था नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

नाशिक : येळकोट येळकोट जय मल्हार! चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

हिंजवडी : डॉग केअर सेंटर हटवा, कासारसाई ग्रामस्थांची मागणी

कोट्यवधी नागरिकांचा डाटा लीक; दोन भावांना अटक

Back to top button