हिंदू महासभा कॉंग्रेस मुख्यालयासमोर उभारणार सावरकरांचा पुतळा | पुढारी

हिंदू महासभा कॉंग्रेस मुख्यालयासमोर उभारणार सावरकरांचा पुतळा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह मत नोंदवल्याने महासभेने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची माग‍णी केली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करतात. राहुल गांधी मानसिक रित्या आजारी आहे. इंग्रजांच्या इशाऱ्यावर ते महान स्वातंत्र्य सेनानींचा अपमान करीत असतील तर हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारने राहुल गांधी यांच्या राजकीय कार्यक्रमांवर तात्काळ प्रभावाने बंदी घालत त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे,असे आवाहन पत्रातून महासभेकडून करण्यात आले आहे.

येत्या २६ फेब्रुवारीला सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त महासभेकडून २४, अकबर रोड स्थित कॉंग्रेस मुख्यालयासमोर सावरकरांचा पुतळा उभारला जाईल, असे पत्रातून महासभेने सांगितले आहे.अकबर रोड चे नाव बदलून वीर सावकर रोड करण्याची मागणी करीत सावरकरांना भारतरत्न देण्याची विनंती पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button