Tulja Bhavani : तुळजाभवानीमातेला ७५ तोळे सोने केले अर्पण; आ. प्रताप सरनाईकांनी सहकुटुंब फेडला नवस | पुढारी

Tulja Bhavani : तुळजाभवानीमातेला ७५ तोळे सोने केले अर्पण; आ. प्रताप सरनाईकांनी सहकुटुंब फेडला नवस

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘ईडी’च्या कारवाईचा ससेमिरा चालू असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी (Tulja Bhavani) मातेला ७५ तोळे सोन्याचे दागिने अर्पण करत नवस फेडला. यासाठी ते सहकुटुंब दर्शनासाठी आले होते.

दोन्ही मुलांची लग्‍न होऊन सर्व काही व्यवस्थित होऊ दे, सगळी संकटे दूर कर, असा नवस बोलला होता. दोन वर्षांपूर्वीच हा नवस पूर्ण करण्यासाठी ते येणार होते. मात्र दोन वर्षे कोरोना व त्यांनतर कुटुंबीयावर काही संकट आल्यामुळे येता आला  नाही. आता वेळ मिळाला. त्यामुळे नवस पूर्ण करण्यास आलो, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Tulja Bhavani)

दोन्ही मुलांचे लग्‍नही झाले असून नातवंडाचे जावळ काढण्यास ते आले होते. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्यांचा देवीला हार अर्पण करुन सरनाईक कुटुंबियांनी देवीचे दर्शन घेतले. तुळजाभवानी देवी कुलदैवत असल्याने वर्षभरात एकदा तरी येऊन दर्शन घेत असतो, अशी माहिती त्यांनी दिली. ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून आमचा लढाही सुरु आहे. यावर अधिक बोलणे उचित नाही, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा;

Back to top button