

पुढारी ऑनलाईन: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बहीण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत गुरुवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. गेल्या १४ दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी सकाळी मध्य प्रदेशात दाखल झाली. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात बोदरली गावात यात्रेचा पहिला थांबा होता. यात्रेत गुरूवारी सकाळी प्रियांकाचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचा मुलगा रेहान आणि काँग्रेस राजस्थानचे युवानेते सचिन पायलट हे देखील या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात बोदरली गावात भारत जोडो यात्रेचा पहिला थांबा होता. येथे गांधी यांचे स्वागत करण्यात आले व बंजारा कलावंतांनी लोककला सादर केली. दरम्यान, मध्य प्रदेशातील पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ट्रान्स्पोर्टनगर येथील जाहीर सभेत बोलताना गांधी यांनी बुऱ्हाणपूर हे प्रेमाचे शहर आहे. हाच प्रेमाचा संदेश घेऊन आपण श्रीनगरला पोहोचणार आहोत, असे सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आजपासून यात्रेत भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत.
प्रियंका गांधी यांच्या सहभागावर काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा फोटो शेअर केला आहे. राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी पोहोचले असल्याचे सांगत. तुम्ही सहभागी झाल्याने आणि आपण एकत्र चालताना पावले आणखी मजबूत होतील, असे ट्विट केले आहे.