American Women : अमेरिकन महिला अधिकारी रिक्षातून जातात ऑफिसला | पुढारी

American Women : अमेरिकन महिला अधिकारी रिक्षातून जातात ऑफिसला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीत असलेल्या अमेरिकन दूतावासातील चार महिला अधिकारी ऑटो रिक्षातून ऑफिसला जातात. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या या रिक्षा आहेत, हे विशेष! एन. एल. मेसन, रूथ होल्मबर्ग, शरीन जे. किटरमन आणि जेनिफर बायवटर्स अशी या महिला अधिकार्‍यांची नावे आहेत. ऑटो रिक्षा चालवणे केवळ मजेशीर नाही तर अमेरिकन अधिकारीही सामान्य जनतेप्रमाणे असल्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे या चार महिला अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. (American Women)

याबाबत मेसन म्हणाल्या, मी कधीच क्लच असणारी गाडी चालवलेली नाही. मी नेहमीच ऑटोमॅटिक मोटारच चालवते. मात्र, भारतात आाल्यानंतर ऑटो रिक्षा चालवणे हा अनोखा अनुभव होता. ज्यावेळी मी पाकिस्तानमध्ये कार्यरत होते, त्यावेळी एका मोठ्या आणि आलिशान बुलेटप्रुफ गाडीतून फिरत असे. त्यातूनच ऑफिसला जात होते; मात्र ज्यावेळी मी ऑटो रिक्षा पाहिली त्यावेळी ती एकदा तरी चालवावी असे मला वाटले. त्यामुळे भारतात आल्यानंतर मी एक ऑटो रिक्षा खरेदी केली. त्यानंतर रूथ, शरीन आणि जेनिफर यांनीही रिक्षा खरेदी केली. (American Women)

मेक्सिकन राजदूतांकडून प्रेरणा (American Women)

भारत वंशीय शरीन यांच्याकडे गुलाबी रंगाची रिक्षा आहे. त्या म्हणाल्या, मेक्सिकन राजदूत मेल्बा प्रिआ यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. प्रिआ यांच्याकडे 10 वर्षांपूर्वी पांढर्‍या रंगाची रिक्षा होती. त्यांचा चालकही होता. भारतात आल्यानंतर मेसन यांची रिक्षा पाहिल्यानंतर मीसुद्धा रिक्षा खरेदी केली.

अधिक वाचा :

Back to top button