Manchester United : युनायटेडच्या चाहत्यांना आणखी एक धक्का; क्लब विकण्यास काढणार | पुढारी

Manchester United : युनायटेडच्या चाहत्यांना आणखी एक धक्का; क्लब विकण्यास काढणार

पुढारी ऑनालाईन डेस्क : फुटबॉल स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या महिन्यात मुलाखतीच्या माध्यमातून प्रशिक्षक टेन हेग आणि क्लबमधील विरष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. यांनंतर त्याने क्लबला (Manchester United) रामराम केला आहे. या धक्यातून सावरण्या त्यानंतर मँचेस्टर युनायटेड चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने साथ सोडल्यानंतर मालकांनी मँचेस्टर युनायटेड क्लब विकायला काढला आहे.

क्लबची मालकी बदलण्याची प्रक्रिया सुरू

इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडने बुधवारी (दि.२३) जाहीर केले की, अमेरिकेच्या ग्लेझरने परिवाराने क्लबचा पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी क्लबची (Manchester United) मालकी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ग्लेझर कुटुंब फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचे मालक आहेत.

तब्बल १७ वर्षे क्लब चालवल्यानंतर ग्लेझर कुटुंब आता मँचेस्टर युनायटेड क्लबची मालकी सोडणार आहे. २०१३ पासून क्लबने प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले नाही. क्लबचे माजी मॅनेजर सर ॲलेक्स फर्ग्युसन यांच्यानंतर अनेक मॅनेजर आले आणि गेले; परंतु कोणीही सर ॲलेक्स फर्ग्युसन यांच्या इतकी यशस्वी कामगिरी क्लबसाठी करू शकले नाहीत. अलीकडेच फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने क्लबबाबत अनेक धक्कादायक विधाने केली होती. त्यांनंतर त्याने तडकाफडकी क्लब सोडण्याचा निर्णय घेत क्लबला रामराम केला. या धक्यातून सावरण्या आधीच मँनचेस्टर युनायटेड विकण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अमेरिकन गुंतवणूकदार करणार खरेदी?

गेल्या काही काळापासून क्लबची कामगिरी चांगली झाली नव्हती त्यामुळे क्लबचे चाहते खूप नाराज होते. या क्लबची किंमत सुमारे पाच अब्ज युरो इतकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लेझर कुटुंबाने ते विकले तर अमेरिकन गुंतवणूकदार ते खरेदी करू शकते. मँचेस्टर युनायटेडने एका निवेदनाच्या माध्यमातून सांगितले की. क्लब आपली पुढील रणनीती बदलण्यास तयार आहे. .

हेही वाचा :

Back to top button