जेवणाची ऑर्डर न पोहोचवल्याने झोमॅटोला ८३६२ रुपयांचा दंड | पुढारी

जेवणाची ऑर्डर न पोहोचवल्याने झोमॅटोला ८३६२ रुपयांचा दंड

जेवणाची ऑर्डर न पोहोचवल्याने झोमॅटोला ८३६२ रुपयांचा दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क – ३६२ रुपयांची जेवणाची ऑर्डर वेळेवर न दिल्याच्या कारणावरून जिल्हा ग्राहक मंचाने झोमॅटोला ८३६२ रुपयांचा दंड केला आहे. ही घटना कोलाम येथील आहे. झोमॅटो आणि संबंधित रेस्टॉरंटने हा दंड भरायचा आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष मोहंमद इब्राहिम, सदस्य संध्या राणी, स्टॅनली हॅरोल्ड यांनी हा निर्णय दिला आहे. (Consumer court directs Zomato to pay ₹8362 as compensation)

जेवणाचे ३६२ रुपये, मानसिक त्रासाबद्दल ५ हजार आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च म्हणून ३ हजार रुपये असे एकत्रित मिळून ८३६२ रुपयांचा हा दंड आहे. ४५ दिवसांत दंडाची रक्कम आदा केली नाही तर १२ टक्के इतका व्याज लागणार आहे.

अरुण कृष्णन या कायद्याच्या विद्यार्थ्याने ही तक्रार दाखल केली होती. आपण दिलेली जेवणाची ऑर्डर मिळाली नाही, तसेच पैसेही रिफंड करण्यात आलेले नाहीत, अशी तक्रार अरुण यांनी केली होती. झोमॅटोचा दावा होता की संबंधित व्यक्ती ऑर्डर घेण्यासाठी जागेवर नव्हता, आणि दुसऱ्या वेळी पत्ता चुकीचा होता. ग्राहक मंचाने कागदपत्रांची तपासणी करून तक्रार योग्य असल्याचा निकाल दिला.

Back to top button