Supreme Court: ‘आरबीआय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी’च्या याचिकेवर सीबीआयला उत्तर सादर करण्याचे आदेश | पुढारी

Supreme Court: 'आरबीआय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी'च्या याचिकेवर सीबीआयला उत्तर सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बॅंक घोटाळ्यांच्या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशा विनंती याचिका भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केली होती. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय तसेच आरबीआयला नोटीस बजावली आहे.

दरम्‍यान, येत्या एका महिन्याच्या आत याबाबत संबंधितांना उत्तर सादर करावे लागणार आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॅंक घोटाळे झाले असून त्या अनुषंगाने रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशा विनंतीची याचिका सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केलेली आहे.

किंगफिशर कंपनी, बॅंक ऑफ महाराष्ट्र तसेच येस बॅंकेशी संबंधित घोटाळ्यांत आरबीआयच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा स्वामी यांचा गंभीर आरोप आहे. बॅंकांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची, त्यांचे नियमन करण्याची जबाबदारी आरबीआयची असते. पण असे असूनही गेल्या कित्येक वर्षात संशयित आरबीआय अधिकाऱ्यांची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही, असे स्वामी यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा 

एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, ‘झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो… 

कल्याणच्या रेल्वे लोको शेडमध्ये घुसला कोब्रा; तर बांबू हॉटेलमध्ये विषारी घोणस पाहून ग्राहकांनी काढला पळ 

कोल्हापूर : बिद्रीने ‘एफआरपी’ पेक्षा ५०० रुपये जादा दर द्यावा यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको 

Back to top button