एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, ‘झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो…

एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, ‘झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो…

Published on

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर चांगलेच बरसत आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. त्यामुळेच माझ्यावर अत्याचार करण्यात आला. आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार, खासदार कामाला लागले आहेत. मात्र शेर तो अकेला होता है…. झुंड मे तो गिधाड आते हैं असे म्हणत खडसे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित एका सभेत आ. एकनाथराव खडसे बोलत होते. विरोधी पक्षनेता असताना सरकारला धारेवर आणून सोडलं होतं. त्यामुळे एक वातावरण तयार झालं होतं. मात्र मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याने माझ्यामागे भूखंड प्रकरण, ईडी लावण्यात आली, असा आरोप आ. खडसे यांनी केला. आयुष्याचे चाळीस वर्ष ज्या पक्षासाठी घातले तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार का होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित करत तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलात, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केली.

मी पॉवरफूल म्हणूनच…

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे इतक्या पावरफूल आहेत की त्यांना पाडण्यासाठी दोन दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार, खासदार कामाला लागले आहेत. माझी ताकद इतकी आहे की, भाजपचे सगळे कसे माझ्या अवतीभवतीच फिरताहेत. माझ्यामुळे एवढ्या सगळ्या जणांना भिंगरी लागली आहे, यावरून मी किती पॉवरफूल आहे हे दिसून येतं. जय पराभव हा नंतरचा विषय आहे. तुम्हाला मी एकटाच काफी आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रति आव्हानच दिलं आहे.

जेलमध्ये टाकण्यासाठी षडयंत्र सुरू…

माझ्या मागे इडी, सीबीआय लावली. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं. आता मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहे. एखाद्याला छळण्यासाठी एखादी यंत्रणा कशी काम करते याच हे उदाहरण आहे. सत्तेचा माज आणि मस्ती सुरू असून मला बघून घेईन म्हणतात. मात्र मी पण आता बघूनच घेईन, असा इशाराही त्यांनी दिला.

गिरीश महाजनांनी माझे पाय धरले…

गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना आ. खडसे म्हणाले, "जामनेरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जंगी सभा झाली होती. तेव्हा गिरीश महाजनांनी धावत पळत येऊन माझे पाय धरले होते. गिरीश महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा यांची बोदवडला होणारी सभा जामनेरला घेतली. सोनिया गांधी यांच्या सभेपेक्षा ती सभा मोठी झाली म्हणून वातावरण बदललं आणि गिरीश महाजन निवडून आले होते, असा दावा एकनाथराव खडसेंनी केला. असं असताना आता तेच गिरीश महाजन मला बघून घेईन अशी भाषा करतात. ईडी लावू, सीडी लावू, इन्कम टॅक्सची चौकशी लावून बघूनच घेतो नाथाभाऊ तुला", असं म्हणतात. तुम्हाला राजकारणात मदत केली. मी काय घोडं मारलंय तुमचं?, असं म्हणत खडसेंनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news