गौतम नवलखा यांच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार | पुढारी

गौतम नवलखा यांच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : तुरुंगाऐवजी घरामध्ये नजरकैदेत ठेवण्याच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे सांगत गौतम नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या या याचिकेची दखल घेण्याची तयारी न्यायालयाने दाखविली आहे. सदर प्रकरणावर सुनावणी कधी करायची, याचा निर्णय न्यायालय शुक्रवारी (दि.१७) घेणार आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे तुरुंगाऐवजी घरात नजरकैदेत ठेवण्याचा भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी नवलखा यांचा विनंतीअर्ज सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मान्य केला होता. तथापि या आदेशाचे पालन झाले नसल्याचा दावा नवलखा यांनी केला आहे. वरिष्ठ वकील नित्या रामकृष्णन यांनी नवलखा यांची बाजू मांडली. त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याचिकेवर सुनावणी कधी घ्यायची, याचा निर्णय शुक्रवारी घेतला जाईल, असे सांगितले. नवलखा हे सध्या तळोजा तुरुंगात बंद आहेत.

नवलखा यांनी घराचा पत्ता देण्याऐवजी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचा पत्ता दिला असल्याची माहिती एनआयएची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. त्यावर कम्युनिस्ट पक्ष हा बंदी घातलेला पक्ष नाही, असा युक्तिवाद नित्या रामकृष्णन यांनी केला.

हेही वाचलंत का?

Back to top button