रॉटवायलरसह ११ प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी – गुरुग्राम ग्राहक मंचाचा निर्णय – Ban on 11 foreign breed dogs | पुढारी

रॉटवायलरसह ११ प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी - गुरुग्राम ग्राहक मंचाचा निर्णय - Ban on 11 foreign breed dogs

११ प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी - गुरुग्राम ग्राहक मंचाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन – गुरुग्राम येथील जिल्हा ग्राहक न्यायालयाने ११ प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या जातीच्या कुत्र्यांना पाळण्याचे यापूर्वी दिलेले परवाने रद्द करून ही सर्व कुत्री ताब्यात घ्यावीत, असेही आदेशात म्हटले आहे. (ban on 11 foreign breed dogs)

अमेरिकन पीटबूल टेरिअर्स, डोगो अर्जेंटिनो, रॉटवायलर, निपोलिटन मास्टिप, बोअरबोएल, प्रेसा कॅनारिओ, वोल्फडॉग, बॅनडॉग, अमेरिकन बुलडॉग, केन कोर्सो, फिला ब्रासिलिरिओ या प्रजातींवर ही बंदी आहे. कुत्र्यांच्या या प्रजाती हिंसक मानल्या जातात. याशिवाय सर्व पाळीव कुत्र्यांची नोंदणी करावी, नोंदणासीठी १२ हजार तर नोंदणी नूतनीकरणासाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.

एक महिलेला कुत्रा चावण्याची घटना गुरुग्राममध्ये घडली होती. या महिलेच्या तक्रारीवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या महिलाल दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई महापालिकेने द्यावी, आणि महापालिका ही दंडाची रक्कम कुत्र्याच्या मालकाकडून वसुल करू शकते, असे आदेशात म्हटले आहे.

ग्राहक न्यायालयाने १६ पानांचे निकालपत्र दिलेले आहे. यात इतरही बऱ्याच अटी घालण्यात आल्या आहेत. गुरुग्राम महापालिकेने सर्व भटकी कुत्री पकडून ती एका ठिकाणी ठेवावीत आणि या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करावे. कुत्रा पाळणाऱ्या कुटुंबांनी एकच कुत्रा पाळावा आणि बाहेर फिरवताना त्याचे तोंड बांधलेले असावे, असेही निकालात म्हटले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर २० हजार ते २ लाख रुपयांचा दंड करावा असेही आदेश देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा

Back to top button