कुत्रा एके काळी होता जंगली लांडगा! | पुढारी

कुत्रा एके काळी होता जंगली लांडगा!

लंडन : माणसाचा सर्वात जवळचा मित्र असलेला प्राणी म्हणजे कुत्रा. अत्यंत स्वामीनिष्ठ असलेला हा प्राणी एकेकाळी जंगली लांडगा होता असे म्हटले तर अनेकांना आश्चर्य वाटू शकेल. ब्रिटनच्या फ्रान्सिस क्रिट इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अलीकडेच याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सुमारे 15 हजार वर्षांपूर्वी माणसाने जंगली लांडगे पाळण्यास सुरुवात केली आणि त्यांनाच आज आपण ‘कुत्रा’ म्हणतो!

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या संशोधनासाठी गेल्या एक लाख वर्षांमध्ये युरोप, सैबेरिया आणि उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या 72 प्राचीन लांडग्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी असे दिसून आले की सध्याच्या काळातील कुत्र्यांचे पूर्व युरेशियाच्या प्राचीन लांडग्यांशी साम्य आहे. मात्र, पश्चिम युरेशियातील लांडग्यांशी त्यांचे साधर्म्य कमीच आहे. याचा अर्थ पूर्व युरेशिया (युरोप +आशिया) क्षेत्रातील लोकांनीच सर्वप्रथमच लांडग्यांना पाळणे व त्यांना माणसांची सवय लावणे सुरू केले. या संशोधनात 16 देशांच्या 38 इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी सहभाग घेतला.

Back to top button