औरंगाबाद: वृद्धेच्या अंगावर धावला कुत्रा, मालकावर गुन्हा दाखल | पुढारी

औरंगाबाद: वृद्धेच्या अंगावर धावला कुत्रा, मालकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धेच्या अंगावर कुत्रा धावल्यामुळे त्या कोसळल्या आणि त्यांचा डावा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना ऑपरेशन करून रॉड टाकावा लागला. एवढे सर्व होऊनही कुत्र्याचा मालक मात्र, ही बाई नाटक करते, असे म्हणून तेथून निघून गेला होता. त्यामुळे प्रकरणात आता कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुरुवारी (दि. 7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. के. पवार (रा. देशमुखनगर) असे कुत्रा मालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गयाबाई शेषराव पवार (65, रा. बारावी योजना, शिवाजीनगर) या 20 सप्टेंबरला सकाळी सात वाजता त्या मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या. देशमुखनगर भागातून पायी जात असताना साडेसातच्या सुमारास काश्मिरा मसाले दुकानासमोर एक पाळीव कुत्रा त्यांच्या अंगावर धावला.

त्यामुळे गयाबाई पवार या घाबरल्या आणि खाल्या पडल्या. त्यात त्यांच्या डाव्या हाताला व पायाला मार लागला. तेथून पायी जाणाऱ्या व्यक्तींनी गयाबाई यांच्या मुलाला फोन करून तेथे बोलावून घेतले. त्यानंतर मुलाने गयाबाई यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तपासणी करून हात व पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. हात व पायाचे ऑपरेशन करून रॉड टाकण्यात आला. त्यानंतर कुत्र्याच्या मालकाचे नाव आर. के. पवार असल्याचे समजले. तसेच, घटना घडली तेव्हा ते तेथे होते आणि ते ही बाई नाटक करते, असे म्हणून निष्काळजी दाखविली होती. त्यामुळे दवाखान्यातून बाहेर आलेनंतर जवाहरनगर पोलिस ठाणे येथे तक्रार केली.

सहा महिने शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड 

फिर्यादी गयाबाई पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला सहा महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड न्यायालय ठोठावू शकते, असे वकीलांनी सांगितले. 

हेही वाचा  

दिवाळी निमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून १५०० ज्यादा गाड्या धावणार

रेल्वेच्या पुणे विभाग व्यवस्थापक रेणू शर्मा यांची बदली

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस देवदर्शन अन् खुर्ची वाचवण्यातच गेले : नाना पटोले

Back to top button