महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक | पुढारी

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक

पुढारी ऑनलाईन, दिल्ली: पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी दोन पाकिस्तानमधील प्रशिक्षित दहशतवादी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी याबाबत माहिती दिली.  स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटके आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांचे एक महिनापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लीपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या.

दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल जवळपास महिनाभरापासून या ऑपरेशनसाठी काम करत होते. पकडलेले दहशतवादी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना लक्ष्य करण्याचा कट रचत असल्यचा दावा पोलिसांनी केला आहे.

त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. ते दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी करत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांचा खरा हेतू आणि लक्ष्य काय होतं हे चौकशीनंतरच उघड होईल.

हेही वाचा: 

Back to top button