‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत सेटलमेंट करणारे शेतकरी नेते’ - पुढारी

‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत सेटलमेंट करणारे शेतकरी नेते’

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा: शेतकरी चळवळीचे नेते समजणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे सेटलमेंट करणारे नेते आहेत. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तडजोड करून ऊस बिलासाठी ८०-२० फॉर्म्युला स्वीकारला. त्याचा तोटा आजही शेतकऱ्यांना बसत आहे, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.

ते म्हणाले, ‘सन २०१३ – १४ हा शेतकरी चळवळीचा काळ होता. चळवळीमुळे साखरेला बाजारात प्रति क्विंटल २ हजार, ५०० रुपये दर असताना उसाला प्रतिटन २ हजार, ८००रुपये दर मिळाला.

युती सरकार असताना राम-लक्ष्मण जोडी म्हणजे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तडजोड करून ऊस बिलासाठी ८०-२० चा फॉर्म्युला स्वीकारला. ते दोघेही तडजोड करणारे शेतकरी नेते आहेत.

ते म्हणाले, ‘शेतकरी संघटना, शेतकरी नेते जास्त झाले आहेत.मिस कॉल देऊन, मोर्चे काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.आम्ही सोडणार नाही, दर त्यांच्या घशातून काढून घेऊ अशा वल्गना शेट्टी करत आहेत.आता करोना महामारीचा काळ आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांवर संकटे येत आहेत.ऊस दराचा प्रश्न सर्वांनी हातात घेतला पाहिजे. सत्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. आम्ही तत्वाशी ठाम आहोत.’

हेही वाचा: 

Back to top button