Railway Food : रेल्वे प्रवाशांकरिता खुशखबर! खाद्यपदार्थ सुविधेत बदल; आता मिळणार डायबिटीज फूड | पुढारी

Railway Food : रेल्वे प्रवाशांकरिता खुशखबर! खाद्यपदार्थ सुविधेत बदल; आता मिळणार डायबिटीज फूड

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवी सुविधा आणलेली आहे. रेल्वेमधील प्रवासादरम्यान खाण्यापिण्याविषयी एक मोठी सुधारणा केलेली आहे. प्रवाशांना आता खाण्यापिण्याच्या आणि इतर काही सुविधा अधिक चांगल्या प्रमाणात मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाने मधुमेहग्रस्त प्रवाशांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Railway Food)

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूमध्ये बदल करण्यात येणार आहे. रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन विभागाला रेल्वे बोर्डने याबाबतच्या सुचना देखील दिलेल्या आहेत. या सुचनेत असे लिहिले आहे की, रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये अधिक चांगल्या प्रकारची सुविधा देण्याबाबतचा उद्देश समोर ठेवून ही सुधारणा करणे गरजेचे आहे. (Railway Food)

प्रवाशांना खाद्यपदार्थांमध्ये मिळणार हे पर्याय

रेल्वे बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये खाण्यापिण्याबाबतीत मिळणाऱ्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासंबंधीचे उपाय अवलंबिले जाणार आहेत. खाद्यपदार्थ विभागाला IRCTC च्या मेन्युमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक पदार्थ, सिजनेबल पदार्थ, सणासुदीच्या दरम्यानचे विशेष पदार्थ आणि खाद्यपदार्थांमधील वेगवेगळ्या आवडीनुसार असणारे पदार्थ यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. प्रवाशांना आता डायबिटीज फूड, बेबी फूड, हेल्थ फूड असे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सध्या रेल्वे मधील प्रवाशांना कोणतेही नवे खाद्यपदार्थ देण्याआधी रेल्वे बोर्डकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे.

खानावळीमध्येही होणार बदल

रेल्वेच्या प्रिपेड योजनेतील प्रवाशांकरिता देखील जेवण आणि उच्चतम दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार असे सांगण्यात आलेले आहे. या सर्व पदार्थांचे दर हे IRCTC द्वारा निश्चित केले जाणार आहेत. इतर मेल आणि एक्सप्रेस रेल्व प्रवाशांकरिता देखील या सुविधेत देखील बदल केला जाईल असे सांगितलेले आहे.

हेही वाचा

Back to top button