Gujarat Elections 2022 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश | पुढारी

Gujarat Elections 2022 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीची  (Gujarat Elections 2022) तारीख जसजशी जवळ येत आहे. तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप, काँग्रेससह आपने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज (दि.१५) गुजरातमध्ये आक्रमक प्रचार करण्यासाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांची समावेश आहे.

Gujarat Elections 2022 : काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जून खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग, कमलनाथ, मोहन प्रकाश, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हैय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा, हे प्रमुख नेते गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून, आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांचा नवीन पेन्शन योजनेला विरोध असून राज्य सरकारविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलनही केले आहे.

राजस्थान, छत्तीसगड या काँग्रेसशासित राज्यांत जुनी पेन्शन अंमलात आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर याठिकाणी भगवंत मान सरकारने जुनी पेन्शन योजना अंमलात आणली होती. त्याचा हवाला दोन्ही पक्ष लोकांना देत आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने जुन्या पेन्शनसाठीचे आजी-माजी सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन तीव— झाले आहे. यामुळे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button