Shraddha Murder Case : फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे; अन् बेडरुममध्ये आफताब दुस-या तरुणीसोबत…

Shraddha Murder Case : फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे; अन् बेडरुममध्ये आफताब दुस-या तरुणीसोबत…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील मेहरौली भागात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, मुलीच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे करून ते ३०० लिटर क्षमतेच्या रेफ्रिजरेटरमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवले आणि एक एक करून ते दिल्लीच्या विविध भागात फेकले. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा खुलासा नुकताच झाला असून यातील घटनाक्रमाने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

२७ वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या 'कसाई' आफताब अमीन पूनावाला बाबतचे धक्कादायक खुलासे सातत्याने समोर येत आहे. यावेळी जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले, त्यावेळी तो दुसऱ्या मुलीलाही डेट करत होता आणि त्याच घरात तिच्यासोबत प्रेमाच्या आनाभाका घेत होता. स्वत:ला फूड ब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्ता असे सांगणाऱ्या आफताबबाबत दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याने ज्या पद्धतीने श्रद्धाची हत्या केली ती अत्यंत घृणास्पद आहे. आफताबने श्रद्धाला मारण्याचा कट रचला होता. यासाठी तो इंटरनेटवर खून करणे आणि या गुन्ह्यातून कसे वाचू शकू याचे मार्ग शोधत असे.

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनात आफताबने आधी श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने मृतदेहाचे ३५ तुकडे कले. मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तो मृतदेहाचे तुकडे घेऊन घरातून बाहेर पडत तो दिल्लीच्या विविध भागात टाकत असायचा.

आफताबचे होते आणखी एका तरुणीशी संबंध

मुंबईतील श्रद्धा वालकर नावाच्या युवतीची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करीत दिल्लीच्या विविध भागात फेकणाऱ्या आफताब पूनावालाचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. श्रध्दाची हत्या केल्याच्या काही दिवसांतच त्याने आपल्या पहिल्या प्रेयसीला घरी बोलावून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ते संबंध ठेवले, त्यावेळी श्रध्दाच्या मृतदेहाचा काही भाग फ्रीजमध्येच होता.

तिसऱ्या मुलीला जाळ्यात अडकविण्या होता प्रयत्न

पहिलीसोबत मौजमजा, दुसरीची हत्या केलेला आफताब तिसऱ्या मुलीला जाळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात होता. त्याने आणखी किती युवतींना जाळ्यात अडकविले आहे, किंवा हत्या केल्या आहेत का, याचा तपास दिल्ली पोलिस करीत आहेत. आफताबने ज्या पध्दतीने श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ते पाहून दिल्लीकर हळहळले आहेत. मुंबईतील मालाडच्या कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या श्रध्दाला जाळ्यात अडकवून आफताब दिल्लीला घेऊन आला होता. श्रद्धाच्या कुटुंबियांनी त्यांच्या संबंधांना विरोध केला होता. पण कुटुंबाचा विरोध धुडकावून लावत श्रद्धा त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती.

श्रद्धा वालकरच्या संपर्कात येण्याआधीपासून आफताब एका डेटिंग साईटवर सक्रिय होता. या साईटवर त्याची एका सायकॉलॉजिस्ट युवतीशी ओळख झाली होती. ती युवती दिल्लीतली होती. श्रद्धाशी संपर्क झाल्यानंतर सायकॉलॉजिस्ट मुलीशी आफताबचा संपर्क कमी झाला. श्रद्धादेखील घरच्या लोकांचा विरोध डावलून दिल्लीला आली होती. श्रद्धा लग्नाचा तगादा लावत असल्याने संतप्त होऊन आफताबने गेल्या मे महिन्यात तिची गळा दाबून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर आफताबने दिल्लीतील सायकॉलॉजिस्ट मुलीला घरी बोलावले व तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.

क्रूरकर्मा आणि विकृत आफताबचे चाळे यावरच थांबले नाहीत तर तिसऱ्या मुलीला जाळ्यात ओढण्याची पूर्ण तयारी त्याने केली होती. डेटिंग साईटद्वारे संपर्क झालेल्या त्या मुलीला घरी येण्याची ऑफर आफताबने दिली होती. आफताबचा मोबाईल डेटा पोलिस तपासत असून त्यातून असंख्य धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान आफताबने महरौलीच्या ज्या ज्या भागात श्रध्दाच्या मृतदेहाचे तुकडे टाकले होते, त्याठिकाणी पोलिस मंगळवारी त्याला घेउन गेले होते. श्रध्दाच्या शरिराचे काही अवशेष पोलिसांना सापडले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचाही पोलिस शोध घेत आहेत.

श्रद्धाचे कापलेले शीर रोज पाहायचा..

आरोपी आफताब इतका क्रूर होता की तो दररोज श्रद्धाचे कापलेले शीर पाहण्यासाठी फ्रिज उघडत असे. जेव्हा त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली तेव्हा त्याने रेफ्रिजरेटरला एका विशेष रसायनाने स्वच्छ केले जेणेकरून फॉरेन्सिक तपासणीत रक्ताचे डाग सापडणार नाहीत.

१० जूनपर्यंत चालवले श्रद्धा वालकरचे इंस्टाग्राम

श्रद्धाचा खून झाल्‍याचे कोणाचाही लक्षात येवू नये यासाठी आफताबने २५ मेपर्यंत तिच्‍या इंस्टाग्राम अकांउटवर मेसज टाकत होता. श्रद्धाच्‍या मित्र आणि मैत्रीणींना तो मेसज पाठवत राहिला. तिला कोणी मेसज पाठवला तर तो उत्तरही देत होता. १० जूननंतर त्‍याने श्रद्धाचा मोबाईल फोन बंद केला. यानंतर श्रद्धाच्‍या मित्र आणि मैत्रीणींना तिची काळजी वाटू लागली. त्‍यांनी तिच्‍या पालकांशी संपर्क केला.

मे २०२२ नंतर आपला मुलीशी संपर्क झालेला नाही. मुलीचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार श्रद्धाचे वडील विकास मदन यांनी दिल्‍लीत मेहरौली पोलीस ठाण्‍यात दाखल केली होती. दिल्‍ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करता धक्‍कादायक माहिती समोर आली.

मृतदेहाचे १० तुकडे पोलीसांनी घेतले ताब्यात

या प्रकरणी दक्षिण दिल्‍लीचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त अंकित चौहान यांनी सांगितले की, "आफताबने ज्‍या खोलीत श्रद्धाचा गळा दाबून खून केला येथेच त्‍याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्‍ये ठवले होते. सलग १८ दिवस त्‍याने जंगलात विविध ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकले. या ठिकाणी पोलिसांनी आज ( दि. १५) आफताबला घेवून गेले. येथे पाहणी करुन मृतदेहाचे तुकडे गोळा करण्‍याचे काम सुरु केले आहे. आफताब सांगत असलेल्‍या ठिकाणी पाहणी सुरु असून आतापर्यत १० तुकडे ताब्‍यात घेण्‍यात आले आहेत." दरम्‍यान आफताबच्‍या संपर्कात असणार्‍या तरुणींचा पोलीस शोध घेत आहेत. या तरुणींशी असणार्‍या संबंधामधून श्रद्धाचा खून करण्‍यात आला आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

आफताब 'सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter 'चा फॅन

खुनी आफताब अमीन पूनावाला ( वय २९ ) याने पोलिस चौकशीत अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत. तो अमेरिकेतील टीव्‍ही मालिका 'सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter'चा फॅन होता. लहानपणी त्‍याने हा शो पाहिला होता. त्‍याने लिव्‍ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा थंड डोक्‍याने गळा दाबून खून केला. त्‍यानंतर या मालिकेत दाखवल्‍याप्रमाणे तिच्‍या शरीराचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्‍ये ठेवले. पुढील १८ दिवस तो दररोज मध्‍यरात्री दोन तुकडे दिल्‍ली नजीकच्‍या मेहरोलीच्‍या जंगलात फेकून देत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter हा अमेरिकेतील गुन्‍हेगारी विषयी टीव्‍ही शो होता. २००६ ते १०१३ या काळात तो दाखवला गेला. या मालिकेचे एकूण ८ सीजन आले होते. या मालिकेतील प्रमुख पात्र असणारा डेक्स्टर मॉर्गन हा दिवसभर पोलिसांसाठी एका प्रयोगशाळेत फॉरेसिंक टेक्निशयन म्‍हणून काम करत असतो. तोच रात्री सीरियल कलर बनतो. मॉर्गन हा अत्‍यंत थंड डोक्‍याने आणि कोणाताही पुरावा न ठेवता खून करत असतो, असे या मालिकेमध्‍ये दाखविण्‍यात आले होते. या मालिकेचा प्रभाव आफताब याच्‍यावर होता, अशी धक्‍कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मालिकेत दाखवल्‍या प्रमाणे श्रृद्धाचा मृतदेहाचे केले ३५ तुकडे

आफताब याने १८ मे २०२२ रोजी श्रृद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर तो घाबरला. यावेळी त्‍याला लहानपणी पाहिलेल्‍या सायकोलॉजिकल थ्रिलर Dexterची आठवण आली. त्‍याने श्रृद्धाचा मृतदेह बाथरुममध्‍ये ठेवला. दुसर्‍या दिवशी त्‍याने फ्रिज विकत घेतला. यानंतर १९ मेपासून सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter मालिकेत दाखवल्‍याप्रमाणे तिच्‍या शरीराचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्‍ये ठेवले. पुढील १८ दिवस तो दररोज मध्‍यरात्री दोन तुकडे दिल्‍ली नजीकच्‍या मेहरोलीच्‍या जंगलात फेकून देत होता. अनेकांनी त्‍याला मध्‍यरात्री जंगलात हटकले होते. रात्री जंगलात काय करतोस? अशी विचारणा केली होती. यावेळी त्‍याने उडावीउडवीची उत्तरे देत वेळ मारुन नेली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV (@ndtv)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news