पुढारी ऑनलाईन: देशाला हादरवून सोडणार्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणाबाबत ( Shraddha Walker Murder case) दिल्ली पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या केसमधील हत्येप्रकरणी आफताब याने गुगलवर फरशीवरचे रक्ताचे डाग कसे स्वच्छ करावेत? या प्रश्नाचे उत्तर गुगल सर्च केले होते. फताब याने गुगलवर आणखी काय काय सर्च केले, याचा शोध दिल्ली पोलिस घेत आहेत. सध्या आफताब हा पोलिसांशी फक्त इंग्रजीत संवाद साधत असल्याचे माहिती समोर आली आहे.
खुनी आफताब अमीन पूनावाला ( वय २९ ) याच्या पोलिस चौकशीत पोलिसांकडून अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. तो अमेरिकेतील टीव्ही मालिका 'सायकोलॉजिकल थ्रिलर Dexter'चा फॅन होता. लहानपणी त्याने हा शो पाहिला होता. त्यानंतर यामध्ये पाहिलेल्या घटनेनुसार लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा थंड डोक्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर या मालिकेत दाखवल्याप्रमाणे तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले त्यानंतर पुढील १८ दिवस तो दररोज मध्यरात्री दोन तुकडे दिल्ली नजीकच्या मेहरोलीच्या जंगलात फेकून देत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, "आफताबने ज्या खोलीत श्रद्धाचा गळा दाबून खून केला येथेच त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठवले होते. सलग १८ दिवस त्याने जंगलात विविध ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकले. या ठिकाणी पोलिसांनी आज ( दि. १५) आफताबला घेवून गेले. येथे पाहणी करुन मृतदेहाचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. आफताब सांगत असलेल्या ठिकाणी पाहणी सुरु असून आतापर्यत १० तुकडे ताब्यात घेण्यात आले आहेत." दरम्यान आफताबच्या संपर्कात असणार्या तरुणींचा पोलीस शोध घेत आहेत. या तरुणींशी असणार्या संबंधामधून श्रद्धाचा खून करण्यात आला आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.