कायदा मंत्री रिजिजू यांचा नेहरू यांच्यावरील लेख वादग्रस्‍त : जयराम रमेश | पुढारी

कायदा मंत्री रिजिजू यांचा नेहरू यांच्यावरील लेख वादग्रस्‍त : जयराम रमेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काश्मीर संदर्भात लिहलेल्या लेखामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रिजिजू यांच्यावर टीका केली आहे. काश्मीरचे अखेरचे महाराज हरी सिंह यांचे पुत्र कर्ण सिंह यांनी यासंबंधी लेख लिहून संबंधित घटनांविषयी त्यांच्या वडिलांची भूमिका स्पष्ट केली आहे.

नेहरू यांनी देशाऐवजी परिवाराला प्राधान्य दिल्याचा आरोप रिजिजू यांनी लेखातून केला आहे. पंरतु, त्यांच्या या तर्काला खोडून काढत ही ‘विकृती’असल्याचे रमेश म्हणाले आहे. उत्कृष्ट लेख रिजिजू त्यांच्‍या खोटारडापणा उद्‍ध्‍वस्‍त करतो असे ते म्हणाले.

रमेश यांच्या टीकेनंतर रिजिजू यांनी नवीन तर्कांसह पुन्हा एक लेख लिहत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. २४ जुलै १९५२ मध्ये नेहरू यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणाचा दाखला रिजिजू यांनी लेखातून दिला आहे. या भाषणात त्यांनी जुलै १९४७ मध्ये उपस्थित झालेल्या विलनीकरणाच्या प्रश्नाचा उल्लेख केला होता. नेहरू यांनी कश्मीरकडे एक विशेष मुद्दा म्हणून बघितले. पाकिस्तान लष्कराने काश्मीरवर आक्रमण केल्यानंतर एका दिवसानी २१ ऑक्टोबर १९४७ मध्ये काश्मिरचे तत्कालीन पंतप्रधान मेहर चंद महाजन यांनी लिहलेल्या पत्राचाही उल्लेख रिजिजू यांनी लेखातून केला आहे.

हेही वाचा :

Back to top button