Children’s Day : ‘बालपण मोठ्यांचे’…

Children's Day
Children's Day

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज 14 नोव्हेंबर. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. आज त्यांची १३३ वी जयंती. आज बालदिनही साजरा केला जातो. चाचा नेहरु अशी ओळख असलेल्या नेहरुंचा जन्मदिवस हा बालदिन (Children's Day ) म्हणून साजरा केला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. 1956 पासून बालदिन साजरा केला जात आहे. आज आपण बालदिनानिमित्त राजकीय नेतृत्वांचे बालपणीचे फोटो  पाहणार आहोत.

तुम्हाला माहित असेल की आज बालदिन. पण हा बालदिन ज्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. त्यांचा बालपणीचा फोटो पाहिला आहे का? हे आहेत पं. जवाहरलाल नेहरु म्हणजेच आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. नेहरु हे चाचा नेहरु म्हणूनही ओळखले जायचे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.  हा १४ नोव्हेंबर भारतात बालदिन म्हणून साजरा करतात.

Children's Day
Children's Day

पंडित जवाहरलाल नेहरु यांचा बालचमु सोबतचा एक आनंदी क्षण.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलं का? तर या आहेत पं.जवाहरलाल नेहरु यांच्या कन्या आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी.  इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय किरकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान या ओळखीबरोबरच त्यांची आयर्न लेडी म्हणूनही ओळख होती. इंदिरा गांधी नंतर भारताला अजुनही महिला पंतप्रधान लाभलेल्या नाहीत.

Children's Day
Children's Day

इंदिरा गांधीसोबत ही कोण चिमुकली? तर ही चिमुकली आहेत. त्यांची नातवंड. म्हणजेच सद्या देशभरात भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत असणारे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं आहे. तर दुसरी एक छोटी मुलगी दिसत आहे. ती म्हणजे प्रियांका गांधी-वाड्रा.

Children's Day
Children's Day

आपल्या आईवडिलांसोबत हा कोण असा प्रश्न पडला असेल ना? तर हे आहेत भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह जो मुलगा दिसत आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत.

या फोटोत आपल्या आजोबांसोबत असलेला छोटा मुलगा दिसत आहे तो म्हणजे आदीत्य ठाकरे होय.

Children's Day
Children's Day

या आहेत मुंडे बहीणी. म्हणजे भाजप नेत्या खासदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे.

Children's Day
Children's Day

रावसाहेब रामराव  पाटील उर्फ आर आर पाटील. हे आबा नावानेही ओळखले जायचे. त्यांच्या सोबत जो छोटा मुलगा आहे तो म्हणजे रोहीत पाटील.  आर आर पाटील यांचा मुलगा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news