‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन; ७५ देश, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग | पुढारी

'नो मनी फॉर टेरर' मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन; ७५ देश, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने येत्या १८ आणि १९ नोव्हेंबरला दोन दिवसीय ‘नो मनी फॉर टेरर’ या तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये दहशतवादाचे जागतिक कल आणि दहशतवादाला अर्थपुरवठा, दहशतवादाला अर्थपुरवठा करण्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक स्रोतांचा वापर, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर दिला जाईल.
७५ देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींना या दोन दिवसीय परिषदेत सविस्तर विचारविनिमयासाठी एकत्र आणण्याचा या परिषदेचा उद्देश असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
आगामी एनएमएफटी परिषदेमुळे, विविध देशांमध्ये या समस्येविरोधात जागरुकता आणि सहकार्य निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना पाठबळ प्राप्त होईल, असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी यापूर्वीच इंटरपोलची वार्षिक महासभा तसेच मुंबई आणि दिल्लीत आयोजित करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद प्रतिबंधक समितीची विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा  

Back to top button