गुजरात निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये महेंद्रभाई पाडलिया, मूलूभाई बेरा, ढेलबेन मालदेभाई ओडेदरा, सेजल राजिव पांड्या, हितेश देवजी वसावा, संदीप देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभा जागा आहेत. भाजपने दोन दिवसांपूर्वी (१० नोव्हेंबर) गुजरात निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये घाटलोदियामधून मुख्यंत्री भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर भाजपने आता सहा उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. यामध्ये दोन महिलांना देखील तिकीट देण्यात आले आहेत. या यादीमध्ये महेंद्रभाई पाडलिया यांना धोराजी, मूलुभाई बेरा यांना खंभालिया, ढेलबेन मालदेभाई ओडेदरांना कुतियाना, सेजल राजिव पांड्या यांना भावनगर पूर्व, हितेश देवजी वसावा यांना डेडियापाड़ा आणि संदीप देसाई यांना चोर्यासीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news