Satish Jarkiholi | …तर मी आमदारकीचा राजीनामा देईन! हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर सतीश जारकीहोळींचे आव्हान

Satish Jarkiholi | …तर मी आमदारकीचा राजीनामा देईन! हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर सतीश जारकीहोळींचे आव्हान
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी ऑनलाईन; हिंदू धर्म, हा धर्म, तो धर्म, काय आहे हे? हिंदू या शब्दाचा पारसी भाषेतील अर्थ अतिशय घाणेरडा आहे, असे वक्तव्य कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी केले होते. जारकीहोळी यांचे हे वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याची भावना समाजातून उमटत आहे. यावर आता सतीश जारकीहोळी यांनी टीकाकारांना आव्हान दिले आहे. "मी चुकीचे काही बोललो आहे हे सर्वांना सिद्ध करू द्या. जर मी चुकीचा असेल तर मी केवळ माफी मागणार नाही तर आमदारकीचा राजीनामा देईन," असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

तर कर्नाटक काँग्रेस कमिटीचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सतीश जारकीहोळी यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ते काँग्रेस पक्षाचे मत नाही. पण आम्ही त्यांच्याकडे खुलासा मागणार आहोत. काँग्रेस पक्ष सर्व धर्मांचे समर्थन करतो. यामुळे आम्ही जारकीहोळी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

गौतमबुद्ध, बसवण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या जागर महापुरुषांच्या विचारांचा' या मोहिमेच्या उद्घाटनावेळी सतीश जारकीहोळी यांनी निपाणीत बोलताना हिंदू धर्माविषयी वक्तव्य केले होते. स्वतः जारकीहोळी संस्थापक असलेल्या मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली आहे.

जारकीहोळी (Satish Jarkiholi) म्हणाले होते की, हिंदू हा शब्द भारतीय नाहीच. तो पारशी आहे. पारशी म्हणजे कोण तर इराण, उजबेकिस्तान, तुर्कस्तान. हिंदू हा शब्द त्यांनी आणला. मग अशा परक्या लोकांनी आणलेलं तुम्ही एवढे उचलून का धरले आहे? हे परक्यांनी आणलेलं आमच्यावर लादण्यात आले आहे. तुम्ही हिंदू हिंदू म्हणता. पण हिंदू या शब्दाचा पारशी अर्थ तुम्हाला माहीत आहे का? हिंदू शब्दाचा पारशी अर्थ अतिशय घाणेरडा आहे. हे मी म्हणत नाही आताच स्वामींनी तुम्हाला सांगितले.

यावेळी व्यासपीठावर हेब्बाळचे बसवचेतन स्वामी, म्हैसूरचे ज्ञानप्रकाश स्वामी तसेच काँग्रेस नेते उपस्थित होते. ज्ञानप्रकाश स्वामी यांनीही हिंदुत्व हा फक्त मतांचा अजेंडा बनला आहे, अशी टीका केली होती. सुमारे सव्वा मिनिटांचा सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोमवारी सायंकाळनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या वक्तव्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. निपाणीत भाजप कार्यकर्त्यांनी जारकीहोळी यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news