न्या. डी. वाय. चंद्रचूड उद्या घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी. वाय. चंद्रचूड हे बुधवारी (दि.९) पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड घेतील. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता.
लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ 74 दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. भावी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चंद्रचूड यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून 13 मे 2016 रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते.
हेही वाचलंत का ?