नांदेड : भारत जोडो पदयात्रेदरम्यान कृष्णकुमार पांडे यांचे हदयविकाराने निधन | पुढारी

नांदेड : भारत जोडो पदयात्रेदरम्यान कृष्णकुमार पांडे यांचे हदयविकाराने निधन

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो पदयात्रेदरम्यान काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव मध्य प्रदेश प्रभारी कृष्णकुमार केदारनाथ पांडे (वय ८० वर्ष) यांना हदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना शंकर नगर रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे.

कृष्णकुमार केदारनाथ पांडे यांच्यासोबत असलेले पदयात्री प्रवीण आग्रे नागपूर शहर सेवा दल व त्यांच्यासोबत इतरांना शासकीय वाहनाने नायगाव रुग्णालयात नेले जात आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचे आज भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झाले. त्यांच्या रूपात काँग्रेसचा एक निष्ठावान, खंदा शिलेदार हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पांडे कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष सहभागी आहे. असा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button