राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन : मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. दरम्यान, सत्तार यांच्या निवास्थानासमोर निदर्शने केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह अदिती नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक प्रमुख मेहबूब शेख आणि १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यानंतर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आघाडी, महिला आघाडी यांनी आक्रमक पवित्रा घेत, राज्यात प्रत्येक ठिकाणी निदर्शने केली. याचबरोबर काँग्रेस पक्षाने सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर काँग्रेसच्या मुख्य महिला नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर आयपीसी कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button