अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा रोहित पवार यांच्याकडून निषेध | पुढारी

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा रोहित पवार यांच्याकडून निषेध

पुढारी ऑनलाईन : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याबद्दल राजकीय वतुर्ळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना एका वृतवाहिनीच्या पत्रकाराने विचारले की, “सुप्रियाताई सुळे म्हणतायत की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळालेत का? आणि तेव्हा तुम्ही म्हणता की? तुम्हाला पण द्याचये का? तेव्हा सुळे म्हणतात, तुमच्याकडे आले असतील म्हणून तुम्ही त्यांना ऑफर करताय…” यावरुन प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बदद्ल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते म्हणाले, “इतकी **** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

अब्दुल सत्तार यांच्या वक्त्यव्यावर रोहित पवार यांनीही निषेध केला. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच नेते गलिच्छ बोलतातच आणि राज्यपाल देखील असेच बोलतात, असे रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारचे सामान्य जनतेकडे लक्ष नाही. पावसाळा संपून गेला तरी शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष  नाही. आता ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा, असे ते म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंत्री सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेकही केली. यात खिडक्यांच्या दरवाजाच्या काचा फुटल्या.  यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेहि वाचा 

हिंगोली : पूर्णा-अकोला मार्गावर छपरा एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीचे अंदोलन

 जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट 

राज्यातील गद्दारांचे सरकार कोसळणार : आदित्य ठाकरे

Back to top button