घटस्फोटामुळे ‘तिची’ काटेरी नात्यातून मुक्तता; पतीच्या मारहाणीत झाला होता गर्भपात

घटस्फोटामुळे ‘तिची’ काटेरी नात्यातून मुक्तता; पतीच्या मारहाणीत झाला होता गर्भपात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दारूच्या नशेत पतीने पत्नीचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याचा निष्कर्ष काढून कौटुंबिक न्यायालयाने पत्नीने केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा आदेश दिला. चेतन व सुकन्या (नावे बदलली आहेत) यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याच प्रेमातून पुढे दोघांनी आयुष्य एकमेकांसोबत घालविण्याचा निर्णय घेतला.
2014 मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी सुकन्या हिने जी स्वप्ने पाहिली होती, ती लग्नानंतर सत्यात उतरतील, अशी तिला आशा होती. परंतु, घडलं सगळं उलटं.

लग्नानंतर काही दिवसांतच सुकन्याला तिच्या सासरच्यांनी, पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नापूर्वी प्रेम करणारा चेतन पूर्णपणे बदलला होता. तो दारू पिऊन धिंगाणा घालू लागला. दारूच्या नशेत त्याने तिला मारहाणही केली. सुकन्या गर्भवती असताना त्याने मारहाण केली. पोटावर लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाला. तरीही ती सासरचा अतोनात छळ सहन करीत राहिली. काही कालावधीनंतर सुकन्या पुन्हा गरोदर राहिली.

मात्र, चेतनचा त्रास थांबला नाही. मूल-बाळ झाल्यानंतर पतीच्या वागणुकीत सुधारणा होईल, म्हणून तिने पोलिसांत तक्रार देणे टाळले. परंतु, मुलाचा जन्म झाल्यानंतरही पती आणि सासूने तिला त्रास देणे सुरूच ठेवले. दरम्यान सतीश दुसर्‍या महिलेसोबतच्या संबंधांतून घर सोडून गेला. त्यानंतर सासूने तिचा छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिले. अखेर तिला माहेरी आसरा घ्यावा लागला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली आणि घटस्फोटाची नोटीस पाठवत न्यायालयात धाव घेतली. नोटीस मिळून पती न्यायालयात हजर झाला नाही.

https://youtu.be/uRpprmHUGnM

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news